लवकरच 5000 रुपये खात्यात येणार , शेतकऱ्यांनी हे पहिले तपासा, नाही तर बँकेत पैसे कधीच येणार नाही

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने दगा दिला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांवर संकटाचे

ढग आता जमा झाले आहेत. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेतलाय.

27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या

खात्यात थेट 5,000 रुपयांची आगाऊ मदत जमा करण्याचं कठोर पाऊल उचललं आहे. या निर्णयासाठी सुमारे 7,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण जिथे सरकारी निर्णय असतो, तिथे काही अटीही येतात  हे विसरू नका.

हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात अगदी साधा प्रश्न असू शकतो: “ही रक्कम खरंच मिळणार का, आणि माझं नाव यादीत आहे का?”

त्यात वेगवेगळ्या अफवांनी सोशल मिडीयावर गोंधळ वाढवलायच. म्हणूनच सरकारी निर्णय आणि खऱ्या यंत्रणेतील फरक स्पष्टच ठेवला पाहिजे.आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

सरकारचं स्पष्ट म्हणणं काय? shetkari 5000 rupaye dushkal madat2026

ज्यांच्या खरीप हंगाम 2026 मधील पिकांचं 33% पेक्षा जास्त नुकसान झालंय  आणि ज्यांची नोंद सरकारी दप्तरी आहे, त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.

म्हणजे तालुका दुष्काळग्रस्त असला तरीही नुकसान प्रमाण हे बघणं अनिवार्य आहे. सरकारी दप्तरी नोंद म्हणजे तुमचे दुष्काळी पंचनमा झालंय आणि त्याची नोंद झालेली आहे तसेच त्याचे कागदपत्रे सुद्धा जमा केले आहेत

पैसे देताना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धत वापरण्यात येत आहे. त्या साठी फार्मर आयडी, शेतीची रेकॉर्ड, बँक खात्याची स्थिती

आणि ई-केवायसी यासगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला हव्यात. shetkari-5000-rupaye-dushkal-madat-2026

 

तुम्ही शेतकरी असाल, आणि या योजनेसाठी पात्र असाल, तर खालील गोष्टी लगोलग तपासा:

1. तुमचा फार्मर आयडी तयार आहे का? यातील नाव, शेतीची माहिती, यावर बघा गडबड तर नाही ना?
2. बँक खाते सुरू आणि व्यवहारासाठी योग्य आहे ना?  बदल झाल्यास तात्काळ दुरुस्ती करा.
3. आधार, डीबीटी, इत्यादी बँकिंग तपशील बघा. कुठे चुकलं की मदत जाऊ शकते.( आधार कार्ड ला बँक लिंक आहे का हे या ठिकाणी आहे )
4. ई-केवायसी आधीपासून केलेली असेल तर पुन्हा करण्याची अट नाही. तारीख नीट तपासा – 1 नोव्हेंबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2026 या काळात केलेली ई-केवायसी मान्य आहे.
>5. फायनल आणि सर्वांत महत्त्वाचं – सरकारी यंत्रणेकडून तुमच्या पिकाच्या नुकसानीची नोंद झाली आहे का,( पंचनामा झाला आहे का ?  ) हे खात्री करून घ्या.

या पाच गोष्टी तपासल्या की, मदतीचा मार्ग बहुधा मोकळा!

काही मुद्दे क्लिअर करून ठेवूया:

– प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतील असं नाही. सगळ्या अटी पूर्ण कराव्या लागतात.
– सरकारने गिनतीने 304 तालुके जाहीर केले आहेत – तुमचा तालुका यादीत आहे का, हे आधी बघा.( उदा  पारनेर तालुका आहे का यादीत तर आहे )
– बिगर-शेती उत्पन्नावर आयकर भरणारे, ठरावीक शासकीय नोकर किंवा लोकप्रतिनिधी, आणि काही अपात्र गटांना मदत नाही.

योजनेसाठी वेगळा अर्ज लागेल का?

नाही हे लक्षात ठेवा   यासाठी स्वतंत्र अर्ज लागणार नाही. सरकारी नोंदी, फार्मर आयडी आणि इतर कागदपत्रांच्या आधारावर पैसे थेट खात्यात जमा होतील. म्हणूनच ऑनलाइन अर्ज किंवा नाव टाकण्याचा दावा करणार्‍या संशयास्पद वेबसाइट्सपासून दूर राहा.

 

पैसे आले का, कसे तपासायचे?

मुंबई, पुणे, सोलापूर किवा इतर  कुठेही असाल, काही सोप्या पद्धती आहे याने पैसे आलेले आहे  का ते तपासता येते :
– बँकेने SMS केला आहे का 5000 रुपये जमा चा, तपासा.
– UPI/App वापरत असाल तर खात्याची शिल्लक पहा.( उदा – फोन पे, गुगल पे याद्वारे
– पासबुक जवळच्या बँकेत जाऊन अपडेट करा.
– जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर लाभार्थी यादी तपासा.

याद्वारे पाहू शकता कधी कधी बँकेचा sms येत नाही त्यासाठी UPI द्वारे पाहू शकता

पैसे आले नसतील तर?

पैसे जर आले नाही तर गडबड नका करु. बँकेत  आधी तपासा. जर नाही आले तर कृषी अधिकारी किंवा तलाठ्यांना विचारा. सगळे तपशील योग्य आहेत का  खात्री करून घ्या.

आणखी एक गोष्ट  बँकेने ही मदतीची रक्कम कर्जफेड किंवा वसुलीसाठी वापरू नये, असा शासनाने स्पष्ट आदेश दिलाय. काही गडबड झाली तर तक्रार करा.जर बँकेने पैसे कट केले किवा वसुली केली तर त्यांना स्पष्ट GR दाखवा , नाही तर तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करा.

 

PM किसान/नमो शेतकरी योजनेसारखं आहे का?

 

नाही, ही मदत फक्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे. PM किसान किंवा नमो योजनेचा त्याच्यावर परिणाम होत नाही किंवा त्या निधीशी डायरेक्ट या येणाऱ्या पैशाचा संबंध नाही.

वेगवेगळ्या अफवा, “आजच मिळणार पैसा”, “तुमचं नाव जोडून घ्या”, असे दावे सोशल मिडियावर दिसतात. त्यांचा अनावश्य फॉलो करू नका. सगळा तपशील फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवर, किंवा शेतकरी किंवा प्रशासनाच्या कार्यालयातच मिळवा.shetkari-5000-rupaye-dushkal-madat-2026

 

आता, पुढचं पाऊल तुमचं!

– आधी सगळे कागद व्यवस्थित आहेत का, याची खात्री करा.
– जिल्ह्याची, तालुक्याची यादीमध्ये नाव आहे का, बघा.
– पैसे जमा झाले की नाही, ते तपासा.
– काही शंका, किंवा गडबड आढळली, तर लगेच कृषी सहाय्यक किंवा तहसीलदार कार्यालय संपर्क करा.

सर्वात महत्त्वाचं  कुठलेही पैसे, माहिती किंवा दस्तऐवज कोणत्या अनोळखी Website किंवा व्यक्तीला देऊ नका.shetkari-5000-rupaye-dushkal-madat-2026

शासन निर्णयाची मूळ PDF, अधिकृत GR नंबर आणि इतर सर्व माहितीसाठी https://gr.maharashtra.gov.in वेबसाइटवर एकदा डोकवून घ्या.

तुमच्या खात्यात पैसे कधी येतील, अर्ज पाठवायचा की नाही, पात्रता नियम, कर्जाच्या खात्यात पैसे वळती करणार का  हे सगळं तिथेच सविस्तर आणि नेमकं मिळेल.

शेतकऱ्यांनो, योग्य माहिती मिळवा, अफवांपासून सावध राहा आणि हे 5,000 रुपये तुमच्या अधिकाराचं मानून नक्की मिळवा.

अधिक योग्य माहिती साठी तुम्हीआमचा whatsapp ग्रुप मध्ये नक्कीच सामील व्हा 

aapla Baliraja

Leave a Comment