दुष्काळाने महाराष्ट्रातील गावातल्या शेतकऱ्यांवर आणि जनावरांवर मोठी संकटं आली आहेत. लोकांना नळाला पाणी मिळत नाही, विहिरी आटल्या आहेत, आणि जनावरांसाठी चारा सहज मिळत नाही
रोजचं जगणं कठीण झालंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही ठोस निर्णय घेतले आहेत:
बंद पडलेल्या पाणी योजनांना १५ दिवसांत दुरुस्त करून पुन्हा चालू करण्याचा आदेश दिला आहे, आणि जनावरांच्या चऱ्याबाबत खास नियोजन आणि SOP लागू करण्याची चर्चा झालीय.
यंदा पावसाने अनेक ठिकाणी हुलकावणी दिली, त्यामुळे शेतात पाणी नाही, हिरवी वैरण कमी आहे,
आणि गावात नळाला पाणी नाही इतका त्रास रोजच्या जगण्यात दिसतोय. सरकारी बैठकीतही हा मुद्दा केंद्रस्थानी होता.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर बैठका झाल्या आणि तिथे बंद पडलेल्या पाणी योजनांना १५ दिवसांत पुन्हा सुरू करा,
जिल्हाधिकाऱ्यांनी चाऱ्याचा टंचाईचा अंदाज घेऊन खास SOP तयार करा, आणि चारा बँक सुरु करण्याचा विचार करा, असं ठरलं.
पण या सूचना म्हणजे
प्रत्येक गावात उद्या पाणी येणार, किंवा प्रत्येक शेतकऱ्याला मोफत चारा मिळेल असं नाही. प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी कुठे आणि कशी सुरु आहे,
हे ग्रामपंचायतीकडे किंवा सरकारी कार्यालयात जाऊनच कळणार.
पाणी योजना बंद पडली म्हणजे काय ?
तुमच्या गावात पाणीपुरवठ्याची योजना आहे, पाइपलाइन टाकलेली आहे, विहीर किंवा दुसरा जलस्रोत आहे, पण मोटार बंद पडली, वीज गेली, किंवा पाइप फुटली, म्हणून नळाला पाणी येत नाही. अशा वेळी, आधीच असलेली योजना दुरुस्त करून चालू करायची गरज आहे. त्यामुळे १५ दिवसांत अशी योजना चालू करा, अशी सूचना देण्यात आल्या आहे.
पाणीपुरवठा थांबण्याची कारणं अनेक असू शकतात:
मोटार खराब झाली, पाइपलाइन फुटली, वीजेचा पुरवठा नाही, विहीर आटली, देखभाल झाली नाही, किंवा योजना पूर्णच झाली नाही. कोणती अडचण आहे ते शोधून तातडीने दुरुस्ती करायला हवी.
उदाहरणार्थ,
५०० कुटुंबांचं गाव. मोटार खराब आहे म्हणून पाणी नाही मोटार दुरुस्त केली, वीज व्यवस्थित केली, पाइपलाइन तपासली तर पाणी मिळू शकतं. पण विहीर आटली आहे, तर मोटार दुरुस्त करूनही काहीच उपयोग नाही, मग दुसरा जलस्रोत किंवा पर्यायी संघटना हवी.
तेव्हा १५ दिवसांच्या आदेशाचा फायदा प्रत्येक गावाच्या परिस्थितीप्रमाणेच मिळणार आहे. अडचण शोधा, उपाय करा.
तुमच्या गावात नळाला पाणी नाही?
सुरूवात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माहिती घ्या योजना का चालू नाही? मग सरपंच किंवा ग्रामसेवकाकडे लेखी तक्रार द्या,
पोच मिळाली तर जपून ठेवा. दुरुस्ती पुढे कधी होणार, हे विचारत रहा. काहीच हालचाल नसेल किंवा प्रश्न सुटत नसेल, तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत तक्रार करा.
तक्रार केली म्हणजे लगेच पाणी सुरू होईल, असं नाही; पण आपला प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचतो.
दुष्काळात टँकर हा शेवटचा पर्याय का?
गावाला पाणी कमी पडलं की टँकरची मागणी होते. पण टँकर म्हणजे कायमचा उपाय नाही.
एक उदाहरण: ३०० घरांचं गाव, टँकरने पाणी देता येतं, पण पाणी योजनाच बंद असेल तर त्याची दुरुस्ती करायला हवी. टँकरसाठीही पाण्याचा स्रोत, वाहन, इंधन, वेळापत्रक, आणि पाण्याचं वाटप अशा गोष्टी लागतात.
शक्य असेल तिथे जुनी योजना दुरुस्त करून वापरायला हवी, पण विहिरी, तलाव आटले असतील तर टँकर हा अंतिम पर्याय.
थोडक्यात, जिथे दुरुस्त करून पाणी मिळू शकतं तिथे तसं करा; नाही मिळालं तर टँकर किंवा दुसरा उपाय.
जनावरांच्या चाऱ्यासाठी SOP म्हणजे काय?
दुष्काळात हिरवा चारा कमी होतो. जनावरांना रोज चारा लागतो. चारा विकत घेतला तर खर्च वाढतो, दूधही कमी येतं. म्हणून आधीच नियोजन आवश्यक.
खास SOP म्हणजे कोणत्या गावात किती जनावरे आहेत, चारा किती दिवस पुरेल, कुठे टंचाई जास्त आहे, गरज असल्यावर चारा कसा पोहोचवायचा, हे ठरवायला हवी. ही SOP म्हणजे व्यवस्थापनाची नियमावली.
पण SOP म्हणजे चारा वाटप सुरू आहे किंवा प्रत्येकाला अनुदान मिळणार आहे, असं समजू नका.
स्वतंत्र सरकारी आदेश आणि अटी आहेत त्या आपण तपासायला हव्यात.
चारा बँक म्हणजे काय?
चारा बँक म्हणजे गावात, परिसरात उपलब्ध चारा जमा करायचा, साठवायचा, आणि गरजीनुसार वाटायचा. जसं घरात धान्य साठवतो, तसं चारा साठवण्याची व्यवस्था.
उदाहरण: गाव अ मध्ये पुरेसा चारा आहे, गाव ब मध्ये चारा कमी. उपलब्ध चारा गोळा करुन, वाहतूक आणि साठवण नीट केलं तर टंचाईच्या भागाला मदत करता येते.
मात्र, प्रत्यक्ष चारा बँक सुरु करायची कशी, याचा तपशील अजून स्पष्ट नाही. हे पुढच्या सरकारी निर्णयानुसार ठरू शकतं.
