गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून जमा होतात पैसे ! लाभ घेण्यासाठी लगेच माहिती करून घ्या

घरात बाळ येणार म्हटले की  घरात आनंद असतो, पण खर्चाची टांगती तलवारही असते. तपासणी, औषधं, पोषण, आणि बाळाची देखभाल सगळ्याला पैसे लागतात. याच काळजीची दखल घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पहिल्या अपत्यासाठी सरकारकडून ₹5,000 मिळतात. दुसरं अपत्य मुलगी असेल, तर ₹6,000 मिळू शकतात. पण हे पैसे मिळवायला काही नियम आहेत. हे कसं मिळतं, कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा, काय कागदपत्रं लागतात हे थेट आणि सोपं करून सांगतो.

सर्व सरकारी योजना साठी या दिलेल्या फोटो वर क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
सर्व सरकारी योजना साठी या दिलेल्या फोटो वर क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Table of Contents

किती पैसे मिळतात, कधी मिळतात?

योजनेत मिळणारी रक्कम अपत्य क्रमावर अवलंबून असते.

१.  पहिलं अपत्य: ₹5,000

पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यांत मदत मिळते:
– पहिला टप्पा – ₹3,000: – गर्भधारणेची नोंदणी आणि आरोग्य तपासणी करावी लागते.
– दुसरा टप्पा – ₹2,000: –  बाळाची जन्मनोंदणी आणि लसीकरण पूर्ण करावे लागते.

संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळत नाही. नियम आणि टप्पे पूर्ण केल्यावर हे पैसे मिळतात.

२. दुसरं अपत्य (मुलगी) : ₹6,000

दुसरं अपत्य मुलगी असल्यास ₹6,000 मिळू शकतात. यासाठीही नोंदणी, तपासणी, आणि बाळाच्या जन्माशी संबंधित प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शुद्धपणे सांगायचं झाले तर , मुलगा झाला तर हे पैसे मिळणार नाहीत. आणि मुलगी झाली म्हणून आपोआप पैसे मिळणार नाहीत तर पात्रता आणि कागदपत्रं पाहायला पाहिजे

१. पहिलं अपत्य झाल्यास ₹5,000 कसे मिळतात? उदाहरणासह समजून घ्या

समजा, पूजा ही पहिल्यांदाच आई होणार आहे. तिने गर्भधारणेची नोंदणी केली आणि योजनेनुसार आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या.

  • पहिला टप्पा: पूजाने गर्भधारणेची नोंदणी केली आणि आवश्यक आरोग्य तपासणीच्या अटी पूर्ण केल्या. तिचा अर्ज मंजूर झाल्यास तिला पहिल्या टप्प्यात ₹3,000 मिळू शकतात.

  • दुसरा टप्पा: बाळाचा जन्म झाल्यानंतर पूजाने जन्मनोंदणी केली. बाळाचे आवश्यक लसीकरणही पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या अटी पूर्ण झाल्यास तिला आणखी ₹2,000 मिळू शकतात.

अशा प्रकारे पूजाला पहिल्या अपत्यासाठी एकूण ₹5,000 मिळू शकतात.

लक्षात ठेवा: पैसे मिळण्यासाठी केवळ गर्भधारणेची नोंदणी करून चालत नाही. योजनेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात.

२. दुसरं अपत्य मुलगी झाल्यास ₹6,000 कसे मिळतात? उदाहरणासह समजून घ्या

समजा, सविता यांना आधी एक मुलगा आहे. आता त्यांना दुसरे अपत्य झाले आणि ते मुलगी आहे.

सविता या योजनेच्या पात्रतेत बसत असतील, तर त्यांना दुसऱ्या अपत्यासाठी ₹6,000 मिळू शकतात.

यासाठी गर्भधारणेची नोंदणी, आवश्यक आरोग्य तपासण्या, बाळाच्या जन्माची नोंदणी आणि 14 आठवड्यांपर्यंतचे आवश्यक लसीकरण पूर्ण करावे लागते.

या अटी पूर्ण झाल्यानंतर आणि अर्ज मंजूर झाल्यावर सवितांना ₹6,000 एकाच टप्प्यात मिळू शकतात.

दुसरे अपत्य मुलगा झाल्यास काय होईल?

समजा, सविता यांना दुसरे अपत्य मुलगी न होता मुलगा झाला. अशा वेळी दुसऱ्या अपत्यासाठी असलेले ₹6,000 मिळणार नाहीत.

म्हणजेच, या योजनेत दुसऱ्या अपत्यासाठीचा विशेष लाभ मुलगी झाल्यासच मिळतो

 

सर्व सरकारी योजना साठी या दिलेल्या फोटो वर क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

कोण पात्र आहे?

ही योजना सगळ्यांना मिळत नाही. काही गटातील महिलांना लाभ मिळतो:

  • अनुसूचित जाती-जमाती
  • दिव्यांग महिला
  •  BPL शिधापत्रिका असलेल्या
  • मनरेगा जॉब कार्डधारक
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्या
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पात्र शिधापत्रिका
  • इतर सरकारने ठरवलेल्या आर्थिक आणि सामाजिक गट

वार्षिक उत्पन्न, पुरावे हे नियम संबंधित गटावर अवलंबून असतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अंगणवाडी सेविकेला किंवा वेबसाइटला स्वत: भेट द्या.

 कोणाला लाभ मिळणार नाही?

सरकारी किंवा सार्वजनिक संस्थेत नियमित नोकरी असलेल्या महिलांना, किंवा जे आधीच असेच लाभ घेत आहेत, त्यांना हा लाभ मिळत नाही. अटी आणि कागदपत्रं पूर्ण झाली नाहीत तरी अर्ज मंजूर होत नाही.

अर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

१. अर्ज करताना लागणारी कागदपत्रं:

  • आधार कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • गर्भधारणेची नोंदणीचा पुरावा
  • माता व बाल आरोग्य कार्ड
  • शिधापत्रिका (पात्रता प्रमाणे)
  • जात प्रमाणपत्र/जॉब कार्ड (गरज असेल तर)
  • बाळाचा जन्म प्रमाणपत्र
  • लसीकरणाचा पुरावा
  • मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक माहिती

सगळ्या महिलांना सगळं लागणार नाही; तुमची पात्रता आणि अर्जाचा टप्पा बघून कागदपत्रं बदलतात.

अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन अर्ज  https://pmmvy.wcd.gov.in/   या वेबसाइटवर करता येतो. हे शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविकेची मदत घ्या.

1. वेबसाइटवर जा.
2. ‘लाभार्थी नोंदणी’ शोधा. लॉगिन/नोंदणी करा.
3. वैयक्तिक माहिती, गर्भधारणेचा तपशील, बँक तपशील भरा.
4. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
5. फॉर्म तपासा आणि सबमिट करा.
6. अर्ज क्रमांक जतन करा—त्यामुळे स्टेटस सहज तपासता येईल.

अर्ज करताना अडचण आली, तर अंगणवाडी सेविकेला किंवा बालविकास कार्यालयात नक्कीच संपर्क करा.

 

सर्व सरकारी योजना साठी या दिलेल्या फोटो वर क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
सर्व सरकारी योजना साठी या दिलेल्या फोटो वर क्लिक करून whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

 

पैसे खात्यात कधी येतात ?

मदतीची रक्कम DBT ने थेट बँक खात्यात जमा होते. पण एकदा अर्ज केला की लगेच पैसे येतात असं नाही. कागदपत्रं, अटी सगळं तपासलं जातं. पैसे आले नाहीत, तर अर्जाचा स्टेटस तपासा. बँक तपशील किंवा कागदपत्रात गडबड असेल, ती नक्की सुधारा.

 

जननी सुरक्षा योजनेचे पैसेही मिळतील का?

प्रधानमंत्री मातृ वंदना आणि  जननी सुरक्षा योजना वेगळ्या आहेत. काही महिलांना दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो, पण प्रत्येकाला मिळेलच असं नाही. जननी सुरक्षा योजनेच्या अटी स्वतंत्र आहेत स्वतंत्रपणे तपासा.

 

अधिकृत माहिती कुठे मिळेल?

  1.  वेबसाइट: https://pmmvy.wcd.gov.in/
  2. अंगणवाडी केंद्र: अर्ज आणि मार्गदर्शनासाठी
  3. आशा कार्यकर्ती: नोंदणी आणि आरोग्य प्रक्रियेसाठी
  4. महिला व बालविकास कार्यालय: अडचणी आणि तक्रारींसाठी

 

थोडक्यात

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ₹5,000 आणि दुसरं अपत्य मुलगी असेल तर ₹6,000 मिळू शकतात. पात्रता आणि कागदपत्रं सादर कराव्याच लागतात.

घरात गर्भवती महिला असेल, तर आधी पात्रता तपासा, कागदपत्रं तयार करा, आणि अर्जासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा वेबसाइटला भेट द्या.

 

(FAQs)

1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत किती पैसे मिळतात?

पहिल्या अपत्यासाठी पात्र महिलेला एकूण ₹5,000 मिळू शकतात. दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹6,000 मिळण्याची तरतूद आहे.

2. पहिल्या अपत्यासाठी ₹5,000 कसे मिळतात ?

पहिल्या अपत्यासाठी ₹3,000 पहिल्या टप्प्यात आणि ₹2,000 दुसऱ्या टप्प्यात दिले जातात. यासाठी योजनेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात.

3. दुसरी मुलगी झाल्यास ₹6,000 मिळतात का?

होय. दुसरे अपत्य मुलगी असल्यास पात्र महिलेला ₹6,000 मिळू शकतात. त्यासाठी आवश्यक नोंदणी आणि इतर अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

4. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

सरकारने ठरवलेल्या पात्रता गटांतील महिलांना लाभ मिळू शकतो. यामध्ये बीपीएल शिधापत्रिकाधारक, दिव्यांग, अनुसूचित जाती-जमातीतील आणि इतर पात्र गटांतील महिलांचा समावेश होऊ शकतो.

5. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड, बँक पासबुक, गर्भधारणेच्या नोंदणीचा पुरावा, आरोग्य तपासणीची नोंद आणि पात्रतेनुसार इतर कागदपत्रे लागू शकतात.

6. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा ?

अधिकृत वेबसाइट pmmvy.wcd.gov.in येथे भेट द्या. या अर्जासाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेची मदतही घेता येते.

aapla Baliraja

Leave a Comment